Connect with us

गोवा खबर

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राज्यातील विविध पंचायतींचे प्रबोधन

Published

on

Spread the love
  • गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीचे कठोरतेने पालन करण्याची मागणी

गोवा खबर : मागील काही वर्षांपासून गोवा राज्यात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या आयात व विक्री यांवर शासनाने बंदी लागू केलेली असतानाही इतर राज्यांतून आयात केलेल्या मूर्तींची विक्री निर्बंध न पाळता सुरूच आहे. गोवा राज्य प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींपासून मुक्त करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या या बंदीचे प्रभावीपणे आणि तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने राज्यातील विविध पंचायतींना केले आहे.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही मागणी बार्देश तालुक्यातील पिळर्ण, कांदोळी, साल्वादोर-द-मुंद, पेन्ह-द-फ्रान्स, हणजूण-कायसूय पंचायत, उसप पंचायत, नास्नोडा पंचायत, थिवी पंचायत, वेर्ला-काणका आणि कांदोळी पंचायत; पेडणे तालुक्यात मोरजी, मांद्रे, आगरवाडा आणि वजरी पंचायत; तिसवाडी तालुक्यात करमळी, खोर्ली आणि चिंबल पंचायत; डिचोली चालुक्यात साळ, मेणकुरे आणि शिरसइ पंचायत; फोंडा तालुक्यात कुंडई, मडकई, भोम-अडकोण, तिवरे-वरगाव व वेलिंग-प्रियोळ-कुंकळी पंचायत; सासष्टी तालुक्यात रूमडामळ, राय, आके-बायश, दवर्ली आणि नावेली पंचायत यांच्या मंडळांना भेटून निवेदने देण्यात आली आहेत. इतर पंचायतींच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

हिंदू जनजागृती समितीने अशा प्रकारची निवेदन पूर्वी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आदींना देऊन याविषयी जागृती केली होती. राज्यातील पेडणे तालुक्यातील तांबोशी-मोपा-उगवे पंचायत आणि अन्य एका पंचायतीने पंचायतक्षेत्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवर बंदी घातली आहे.