Connect with us

गोवा खबर

रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘तात्पुरता सरकारी दर्जा’

Published

on

Spread the love

गोवा खबर : गेल्या सात वर्षांपासून सरकारी खात्यांमध्ये व नगरपालिका संस्थांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारने ‘तात्पुरता सरकारी कर्मचारी’ असा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे वेतन वाढणार असून विविध रजा व लाभही लागू होतील.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, सुधारित योजना १ ऑगस्टपासून लागू होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागप्रमुखांकडे हमीपत्र सादर करावे लागेल.

उदाहरणार्थ, सध्या १३ हजार रुपये वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला ५२ टक्के वाढीनंतर सुमारे २० हजार रुपये वेतन मिळणार आहे. याशिवाय रजा, आजारी रजा, मातृत्व रजा यांचाही लाभ मिळेल.