गोवा खबर : येत्या १४ ते १७ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अठराव्या मनोरंजन संस्था आमसभेत घेतला.
या महोत्सवात गोव्यातील कोकणी आणि मराठी चित्रपटांची खास झलक पाहायला मिळणार आहे. मॅकनिझ पॅलेस थिएटर व आयनॉक्समध्ये महोत्सवाचे आयोजन होणार असून, विविध कार्यशाळा, संवाद सत्रे आणि चित्रपट प्रदर्शनाचा समावेश असणार आहे.

गोवा राज्यातील चित्रपटसृष्टीच्या ७५ वर्षांचा गौरव करण्यासाठी महोत्सवाची थीम ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये मागील तीन आवृत्त्यांतील (२०१८–२०२३) निवडक चित्रपट दाखवले जातील.
महोत्सवाच्या तयारीसाठी चित्रपट सादर करण्याची प्रक्रिया १७ जून ते ७ जुलै या कालावधीत पूर्ण झाली आहे. या बैठकीला मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.