गोवा खबर : स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये गोवा पातळीवर साखळी नगरपालिका अव्वल ठरली आहे. या कामगिरीसाठी दिल्ली येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात पालिकेला पुरस्कार मिळणार आहे.

नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी सांगितले, नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सफाई कामगारांच्या मेहनतीमुळे हा यशाचा टप्पा गाठता आला. रस्त्यांच्या कडेला कचरा कमी व्हावा यासाठी जनजागृती करण्यात आली. ई-कचरा, जुने कपडे व घरगुती कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या.
मुख्यमंत्री सावंत यांनीही पालिकेच्या कामगिरीचे कौतुक करत, स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.