Connect with us

गोवा खबर

नोकऱ्यांकरता कधीच पैसे घेतले नाहीत : मंत्री राणे यांचे स्पष्टीकरण

Published

on

Spread the love

गोवा खबर :  एका जुन्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी कधीही नोकरी लावण्यासाठी कोणाकडून पैसे घेतलेले नाहीत.

जर कोणी आरोप करत असेल, तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. आरोग्य खात्यात सर्व काही पारदर्शक पद्धतीने होत असून, सध्या ही क्लिप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम वापरली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.