Connect with us

गोवा खबर

फोंड्यातील प्रकल्पांना वेग; वाढीव एफएसआय धोरण लवकरच

Published

on

Spread the love

गोवा खबर : फोंड्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी लवकरच नवीन धोरण जाहीर होणार असल्याची माहिती वनमंत्री राणे यांनी दिली. वाढीव एफएसआय धोरणामुळे स्थानिकांना घर बांधणे आणि विकासकामे अधिक सुलभ होतील.

फोंडा शहराचा मास्टर प्लॅन तयार असून, त्यानुसार लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. यावेळी मंत्री राणे यांनी फोंडा नगरपालिकेला ७ दिवसांत वर्क ऑर्डर जारी करण्याचे निर्देश दिले.

रवी नाईक हे भांडारी समाजाचे मोठे नेतृत्व

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांचा गौरव करताना सांगितले की, वय झाले असले तरी रवी नाईक यांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे आजही मौल्यवान आहे. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यावर मुख्यमंत्री असलेल्या रवी नाईक यांनी तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिली होती.