Connect with us

गोवा खबर

दिव्यांग बांधवासाठी मोठा दिलासा : राजन चारी यांना तीनचाकी दुचाकी वाटप

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्ये मतदारसंघातील ठाणे येथील रहिवासी राजन देमगो चारी यांना पंतप्रधान दिव्यांगजन सक्षमीकरण उपक्रमांतर्गत तीनचाकी मोटरसायकल प्रदान करण्यात आली. ही दुचाकी आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात देण्यात आली.

आमदार राणे म्हणाल्या, “दिव्यांग बांधवांना सक्षम बनवण्याचे केंद्र सरकारचे धोरण खरोखरच स्तुत्य आहे. ही दुचाकी त्यांच्या रोजच्या जीवनात सुलभता आणेल आणि आत्मनिर्भरतेकडे त्यांचे पाऊल पडेल.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचे विशेष आभार मानले.

राजन चारी यांच्यासाठी ही सुविधा एक नवा जीवन बदल घडवणारा क्षण ठरला असून, अशा उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.