Connect with us

गोवा खबर

गोवा घटक राज्य दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन, प्रतिष्ठितांचा सत्कार

Published

on

Spread the love

गोवा खबर : ३९ वा गोवा घटक राज्य दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम ३० मे रोजी सकाळी ११ वाजता पणजीतील कला अकादमी येथील दीनानाथ मंगेशकर कला मंदिर येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय सहसचिव अर्चना अवस्थी, आयआरएस आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.

या प्रसंगी गोव्यातील प्रतिष्ठिताना राज्याच्या आर्थिक विकासात आणि गोव्याची ओळख जपण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल. बिगफूट, लोटली, कॅफे तातो, पणजी, गोमंत विद्या निकेतन, मडगाव, पॉल जॉन डिस्टिलरीज, कुंकळी,  झांटे काजू, डिचोली, डांगी ऑप्टिशियन म्हापसा, मावझो फोटो स्टुडिओ, मडगाव, डॉ. कार्मो ग्रासियास हॉस्पिटल, मडगाव, टिटोस, बागा आणि सागर नाईक मुळे, फोंडा यांचा समावेश आहे.

उल्हास न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत गोवा पूर्णपणे साक्षर राज्य म्हणून घोषित केले जाईल आणि  हा राज्यासाठी एक महत्त्वाचा क्षण असेल.

या प्रसंगी, मुख्यमंत्री ‘गोवा-पुर्वीचा आणि आताचा’ या गोव्याच्या घटक राज्य दिनासंबंधित काही दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.

अभिलेख खात्याची ‘भारत है हम’ या वेब सिरीजचाही यावेळी शुभारंभ केला जाईल. याशिवाय, या कार्यक्रमात गोव्यातील मंदिरे, ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’ आणि ‘विकास पथ: गोव्याची सुधारणा आणि नवीकरणाचा प्रवास’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन होईल.

गोवा घटक राज्य दिनाच्या समारंभात लाभार्थ्यांना गृह खात्याच्या सीएफएफ आणि कार्मिक खात्याच्या अनुकंपा योजनेअंतर्गत प्रायोजक पत्रे वितरीत केली जातील.

राज्याला स्वयंपूर्ण बनविण्याच्या प्रयत्नांसाठी स्वयंपूर्ण गावे आणि स्वयंपूर्ण मित्रांचा या प्रसंगी सत्कार केला जाईल.

प्रशासनातील सर्वोत्तम पद्धतींचे पालन केल्याबद्दल पाच सरकारी खात्यांना सन्मानित केले जाईल. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमावरील कामासाठी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खाते, कचरा व्यवस्थापन उपक्रमांसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, अपंग व्यक्तींशी संबंधित त्यांच्या एकूण कामासाठी अपंग व्यक्तींसाठी सक्षमीकरण खाते, स्वयं-मदत गटांच्या सक्रीय सहभाग आणि सुधारणांसाठी काम केल्याबद्दल ग्रामीण विकास खाते आणि जॉगर्स पार्क जवळील चिखली येथील कचरा उपक्रमासाठी पंचायत खाते यांचा समावेश आहे.