Connect with us

गोवा खबर

जोझफिन डायस पुरस्कारासाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा तियात्र अकादमी अकादमीने जोझफिन डायस पुरस्कार-२०२५ साठी अर्ज मागविले आहेत. हा पुरस्कार तियात्र, त्याची गाणी आणि संगीताच्या विकासात योगदान देणाऱ्या तरुण प्रतिभावंताना प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो.

हा प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नसलेल्या पुरुष किंवा महिला कलाकारांसाठी देण्यात येतो. १०,०००/- रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. निवडलेल्या कलाकाराने जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या एका विशेष समारंभात पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

इच्छुक अर्जदारांनी अर्ज नमुना गोवा तियात्र अकादमी एएस-१. दुसरा मजला, कांम्पाल ट्रेड सेंटर कांम्पाल, पणजी कार्यालयातून मिळवावा किंवा https://tiatracademyofgoa.com या वेबसाइटवरून डाउनलोड करावा.

विहित नमुन्यातून भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत सादर करण्याची शेवटची तारीख १० जून २०२५ अशी आहे.