Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून जनतेला बैसाखीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: शीख बांधवांना बैसाखीच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, बैसाखीच्या शुभप्रसंगी मी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. बैसाखी हा शीख समुदायाचा सर्वात महत्वाचा सण आहे जो मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो. १६९९ मध्ये याच दिवशी शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंग यांनी पंथ खालसाची स्थापना केल्यामुळे याला एक धार्मिक महत्त्व आहे. बैसाखी हा सण म्हणजे शीख समुदायाच्या नवीन वर्षाचा प्रारंभ.  या सणाला प्रदेशानुसार वेगवेगळी नावे आहेत.

आपल्या भारतात धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व असलेले अनेक सण आणि परंपरा आहेत. समाजात सुखाचे आणि आनंद वातावरण निर्माण करण्यासोबतच राष्ट्रीय एकता आणि सामाजिक अखंडता बळकट करण्यासाठी असे सण महत्त्वाची भूमिका बजावितात. इतर प्रत्येक भारतीय सणाप्रमाणे, बैसाखी हा सणही लोकांना एकत्र आणतो.

या वर्षाचा बैसाखीचा हा शुभ सोहळा गोव्यातील लोकांना नवीन आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.