गोवा खबर : आल्वारा हक्क असलेल्या नागरिकांना त्यांच्या जमिनींचे मालकी हक्क अद्याप मिळालेले नाहीत. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लोकांना न्याय मिळावा, अशी मागणी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत केली.
त्यांनी सरकारला यावर त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन केले. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे लक्षात घेऊन शासनाने योग्य पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.