Connect with us

गोवा खबर

गोमेकॉमध्ये हिमोफिलियावर जागरूकता; राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन आणि बालरोग विभागाने वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत ‘हिमोफिलिया कॉन्क्लेव्ह २०२५’चे आयोजन केले. या कार्यक्रमात हिमोफिलिया या आजारावर सखोल चर्चा करण्यात आली, तसेच या संदर्भातील अद्ययावत उपचारपद्धतींवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कॉन्क्लेव्हमध्ये गोमेकचे आधुनिक ऑडिओव्हिज्युअल सुविधांसह विविध सत्रे झाली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी हिमोफिलियावर उपचार आणि संशोधनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.