गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्ह्यातील सासस्टी तालुक्यातील सां जुझे दी आरियल ग्रामपंचायतीतील वार्ड-२ आणि सांगे तालुक्यातील नेतुर्ली ग्राम पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये ९ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या पोटनिवडणूक होणार असून मतदान दिवस आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक होणाऱ्या वार्डातील सर्व दारू विक्री अस्थापने, बार ८, ९ आणि १० मार्च २०२५ रोजी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेली अस्तापनाना फक्त खाण्याचे जिन्नस विक्री करता येईल आणि तसे सूचना देणारे बोर्ड लावावे लागतील. बार काऊंटर बंद ठेवावा लागेल.
त्याचप्रमाणे वरील दिवसात पोटनिवडणूक होणाऱ्या भागात दारूची वाहतूक करण्यास किंवा जवळ बाळगण्यास निर्बंध लागू केले असून कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील किंवा जवळ बाळगू शकतात.