Connect with us

गोवा खबर

छ. शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी उदय भेंब्रे यांचा निषेध

Published

on

Spread the love

गोवा खबर : साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य यांनी बार्देश येथे स्वारी करून तेथील लोकांची घरे लुटली आणि घरांमधून महिलांना उचलून नेले. द्वेषमूलक खोटा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांचा हिंदू जनजागृती समितीने माऊली मंदिर, मेणकुरे, डिचोली येथे आयोजित केलेल्या हिंदू राष्ट्र-जागृती सभेत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

या सभेला हिंदू जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.

ADVT Viva Carnaval 2025 from 1st to 4th March across Goa! Get ready for dazzling parades, music, and pure joy!

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात पोर्तुगिजांनाही हादरा दिला होता. इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकर, टी. बी. कुन्हा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अ. का. प्रियोळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोव्याच्या इतिहासाविषयी लिहीलेले आहे, तरीही कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान केले असल्याचे समितीने म्हटले आहे.

सभेत मार्गदर्शन करतांना गोविंद चोडणकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यातील अनेक तालुक्यांवर नियंत्रण मिळवल्याचे इतिहासात नमूद केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोलवाळ किल्ला जिंकल्याचे; नार्वे येथे श्री सप्तकोटेश्वर मंदिराची उभारणी केल्याचे आणि बेतुल येथे नवीन किल्ल्या बांधल्याची माहिती इतिहासात आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खरा इतिहास समाविष्ट केला असता तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या साहित्यिकांची आज कोणी गय केली नसती. गोवा सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महराज यांचा खरा इतिहास मुलांना शिकवावा अशी आग्रही आहे.