Connect with us

गोवा खबर

१० फेब्रुवारीपासून विद्यार्थी संसद स्पर्धेचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्वरीतील गोवा विधिमंडळ सचिवालयाने गोवा विधिमंडळ मंचाच्या सहकार्याने २०२४-२५ या वर्षासाठी विद्यार्थी संसद स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी समुदायामध्ये स्वयंशिस्तअभिव्यक्तीचा अधिकारइतरांच्या मतांबद्दल सहिष्णुतासुधारित वादविवाद आणि लोकशाही जीवनशैलीच्या विविध गुणांशी स्वतःला परिचित करून देण्यासाठी केले आहे.

२०२४-२५ या वर्षासाठी विद्यार्थी संसद स्पर्धा १० ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पीएसी/पीयूसी खोलीविधानसभा प्रकल्प पर्वरी येथे आयोजित केली जाईल. राज्यातील एकूण २४ महाविद्यालये विद्यार्थी संसद स्पर्धा२०२५ मध्ये सहभागी होतील.

सभापती रमेश तवडकर यांच्या उपस्थितीत १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यार्थी संसद स्पर्धा२०२५ चा उद्घाटन समारंभ पीएसी/पीयूसी खोलीविधानसभा प्रकल्प पर्वरी येथे होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला विद्यार्थी, शिक्षक, पत्रकारांना आमंत्रित केले आहे.