Connect with us

गोवा खबर

ओपा खांडेपार येथे अनुसूचित जाती/जमाती आयोगाच्या अध्यक्षांची भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर यांनी ओपा, खांडेपार येथे नुकतीच भेट दिली. जयवंत आवडो गावडे आणि इतर स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून वापरत असलेल्या त्यांच्या पारंपारिक स्मशानभूमीत प्रेत दहन करण्यास वन खात्याचे अधिकारी अडवणूक करीत असल्याबद्दल गोवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली.

दीपक करमळकर यांनी या प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ओपा, खांडेपार येथील ग्रामस्थांना थांबवू नये असे आदेश वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले तसेच वनखाते, पंचायत आणि ओपा खांडेपार येथील ग्रामस्थांच्या सहमतीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत असे त्यांनी सांगितले.

उपवनपाल जे वर्के, वन अधिकारी दीपक तांडेल, ॲड. उपासो गावकर, रेंज वन अधिकारी दीपा रेडकर, सुदेश गावडे, कुर्टी खांडेपारचे सरपंच अभिजित गावडे, जयवंत गावडे आदी सदस्य उपस्थित होते.