Connect with us

गोवा खबर

१७ जानेवापासून आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव

Published

on

Spread the love

गोवा खबर : माहिती आणि प्रसिध्दी खात्याने श्री मुद्रा यांच्या संयुक्त विध्यमाने पणजी मनोरंजन संस्थेत १७ ते १९ जानेवारी २०२५ रोजीपर्यंत व्हेव्स आंतरराष्ट्रीय  लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.

या वर्षी महोत्सवात जगभरातून २१४ चित्रपट मिळाले असून तीन दिवसांच्या कार्यक्रमात प्रदर्शनासाठी ९३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव उदयोन्मुख आणि व्यावसायिक चित्रपट निर्मात्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एस चांगले व्यासपीठ म्हणून काम करते.

या महोत्सवात विविध क्षेणीतील विजेत्या चित्रपटांचा आणि व्यक्तींचाही गौरव करण्यात येईल. उपस्थिती विनामुल्य असून सर्वांसाठी नोंदणी प्रक्रियेनंतर खुली आहे.

अधिक माहितीसाठी www.wavesgoa.in वर भेट द्यावी.