Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना नाताळाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेलाविशेषत: ख्रिश्चन बांधवाना नाताळ सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

      आपल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, “नाताळ हा एक आनंदाचा सण असून तो येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनी साजरा केला जातो. शांतता आणि सौहार्दाची भावना जागृत करण्याचा हा दिवस आहे. जगभरात नाताळ हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. लोकांच्या भल्यासाठी स्वतःचा त्याग करणाऱ्या येशू ख्रिस्ताचे जीवन आपल्याला शांतताकरुणाक्षमात्यागबंधुता आणि सलोख्याचा संदेश देतो. “येशू ख्रिस्ताची नम्रता आणि संवेदनशीलतेने जगाला गरीब आणि गरजूंची सेवा करण्याची प्रेरणा दिली. राष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण सर्वांनी संघटित होऊया.

नाताळ सण आपण सर्वांच्या जीवनात आनंद घेऊन येवो आणि प्रभु येशू सर्वांना त्यांच्या समोर येणाऱ्या आव्हानाना तोंड देण्यास आणि फलदायी जीवन जगण्याची शक्ती देवो,” असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.