Connect with us

गोवा खबर

अस्वच्छ हॉटेल्सबाबतच्या तक्रारींची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील काही रेस्टॉरंट्समधील स्वच्छतेबाबत स्थानिक रहिवाशी तसेच पर्यटकांकडून तक्रारी आल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तत्काळ कडक उपाययोजना अमलात आणण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

एफडीए अधिकारी आणि थर्ड पार्टी ऑडिटर पॅनल राज्यभरातील सर्व रेस्टॉरंट आस्थापनांची स्वच्छता तपासणी करणार आहेत. सर्व रेस्टॉरंट्सनी आता त्यांच्या आवारात अधिकृत स्वच्छता रेटिंग प्रमाणपत्र प्राप्त करणे तसेच ते ठळकपणे प्रदर्शित करणे गरजेचे असणार आहे.

हे सर्वसमावेशक ऑडिट एफएसएसएआय अन्न सुरक्षा मानकांचे पालन, योग्य स्वच्छता प्रोटोकॉलची देखभाल, कर्मचारी स्वच्छता प्रशिक्षण पद्धती आणि कचरा व्यवस्थापन प्रणालींचे मूल्यांकन करणार आहे. रेस्टॉरंट मालकांनी या आवश्यकतांचे पूर्ण पालन करणे आवश्यक असणार आहे. तसे न केल्यास अन्न सुरक्षा नियमांनुसार त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.

या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश अन्न सुरक्षा मानके वाढवणे आणि गोव्याच्या रेस्टॉरंट उद्योगावर जनतेचा विश्वास वाढवणे हा आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण किंवा अतिरिक्त माहिती मागणारे रेस्टॉरंट मालक नियमित कार्यालयीन वेळेत एफडीए कार्यालयाशी संपर्क साधू शकतात, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे.