Connect with us

गोवा खबर

रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलचे मातृभूमी परिचय शिबिर उत्साहात

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलचे गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुलचे यंदाचे मातृभूमी परिचय शिबिर शांतादुर्गा गुरुकुल कवळे येथे झाले.

इयत्ता सातवीचे विद्यार्थी व शिक्षक असा 21 जणांचा संघ रत्नागिरीहून गोव्याला शिक्षण सहलीच्या निमित्ताने शांतादुर्गा गुरुकुल कवळे येथे पाच दिवसांच्या मुक्कामासाठी होता. यावेळी शांतादुर्गा गुरुकुलच्या वतीने विविध सत्रे आयोजित करण्यात आली.

चित्रकला प्रशिक्षण, योग वर्ग, मैदानी खेळ, आयुर्वेदिक वैद्यकीय माहिती, प्रेरणादायी- गोष्टींचे सत्र, हस्तकला आदी उपक्रम घेण्यात आले. गोवा शिक्षण सहलीत सेंट्रल वाचनालय पणजी, जुने गोवा, बोंडला अभयारण्य, तांबडीसुर्ला ऐतिहासिक मंदिर, म्हार्दोळ-मंगेश देवस्थाने आदी क्षेत्रांची भेट घेतली.

या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरली ते राजभवन भेट. राज्यपालांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मुलांशी संवाद साधला. गोवा दर्शनानंतर 5 दिवसांच्या शिबिराचा समारोप सोहळा शांतादुर्गा गुरुकुल कवळे येथे झाला.

यावेळी शांतादुर्गा गुरुकुलचे आजी व माजी विद्यार्थ्यांतर्फे खास मनोरंजनाची सत्रे आयोजण्यात आले होते. समारोप सोहळ्याला शांतादुर्गा शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीकुमार सरज्योतीषी, व्यवस्थापक नारायण नावती, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सागर तारी व गुरुकुल प्रमुख संभाजी खामकर उपस्थित होते.