Connect with us

गोवा खबर

नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोवा सहभागी  होणार

Published

on

Spread the love

 गोवा खबर: मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही नवी दिल्लीतील आयकोनिक भारत मंडपात १४ ते २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आयोजित केलेल्या ४३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोवा राज्य सहभागी होणार आहे.  या वर्षाची मेळाव्याची संकल्पना ‘विकसित भारत@ २०४७ अशी आहे.

विविध पैलूंवरील माहिती प्रभावीपणे संप्रेषणाच्या विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यासाठी राज्य सरकारची नोडल एजन्सी असलेले माहिती आणि प्रसिध्दी खाते हा या वार्षिक व्यापार मेळाव्यामध्ये गोव्याच्या सहभागासाठी नोडल विभाग आहे ज्यामध्ये मेळ्यामध्ये पर्यटन खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य, नियोजन आणि सांख्यिकी, गोवा राज्य जैवविविधता, जीआयडीसी, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर खाते, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन सुविधा मंडळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते यात सहभागी होतील.

माहिती संचालक श्री. दिपक बांदेकर यांच्याहस्ते भारत मंडपात २०३ चौ. मी, जागेत उभारण्यात आलेल्या गोवा दालनाचे उद्घाटन करण्यात येईल.

 या व्यतिरिक्त, हस्तकला, वस्त्रोध्योग आणि कॉयर खात्यामार्फत गोव्यातील कारागीर गोवा दालनामध्ये त्यांची पारंपरिक गोव्याची उत्पादने, वस्तूंची विक्री करतील. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी १४ दिवसांच्या व्यापार मेळाव्याच्या समारोपापूर्वी गोवा स्टॉलवर केवळ पारंपारिक गोवा उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भर दिला जाईल.

गोवा दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे गोव्यातील कलाकारांचे गोव्याच्या पारंपारिक आणि संस्कृतीवरील कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येईल.