गोवा खबर:वाहतूक संचालनालयाने सप्टेंबर २०२४ या महिन्यातील अपघात आणि चलनाचा मासिक अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, १९५ रस्ते अपघातांपैकी १५ प्राणघातक अपघात (उत्तर गोवा – १० आणि दक्षिण गोवा -५), ११ गंभीर अपघात (उत्तर गोवा – ६ आणि दक्षिण गोवा -५), २५ किरकोळ अपघात (उत्तर गोवा – १३ आणि दक्षिण गोवा – १२) आणि १४४ गैर – दुखापती अपघात (उत्तर गोवा – ८० आणि दक्षिण गोवा -६४). या अपघातांमध्ये एकूण १८ जणांना जीव गमवाव लागला त्यात (उत्तर गोवा – १३ आणि दक्षिण गोवा – ५), १३ लोक गंभीर जखमी झाले (उत्तर-८ आणि दक्षिण-५) तर ३४ लोकांना किरकोळ दुखापत झाली (उत्तर-१८, दक्षिण-१६).

१० स्वार, (उत्तर-७ आणि दक्षिण-३) ६ पी/रायडर्स, (उत्तर-४ आणि दक्षिण-२) १ ड्रायव्हर उत्तर गोवा आणि १ पादचाऱ्यांला या अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूक संचालनालयाने सप्टेंबर २०२४ या महिन्यात १२३९२ चलन जारी केली आहेत.