गोवा खबर:NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या गैरव्यवहार आणि पारदर्शकतेबद्दल चर्चेत आहे. गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ महासचिव सुदीप नाईक यांनी देशातील विद्यार्थी समुदायामध्ये भीती आणि चिंता निर्माण केल्याबद्दल एनटीएचा निषेध केला.
NEET घोटाळ्याबद्दल बातम्या चालू होत्या की NTA ने UGC NET परीक्षा आयोजित केल्याच्या चक्क एका दिवसानंतर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या आघातातून विद्यार्थी बाहेर येत होते की NTA ने आणखी एक नोटीस जारी केली की CSIR NET परीक्षा देखील पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अशा घटनांमुळे या नाहक अडचणीत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. पेपरफुटीचा अंदाज आणि एजन्सीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांपुढे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष कमी होत आहे.
जीएस सुदीप नाईक म्हणाले, “सर्व परीक्षांबाबत सीबीआयकडून एनटीएची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. परंतु त्याचवेळी परीक्षांमध्ये कामगिरी करण्यासाठी खूप मेहनत करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होता कामा नये. शिक्षण मंत्रालय आणि सीबीआयने विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठोर आणि त्वरित कारवाई करावी.”