Connect with us

गोवा खबर

२३ जून रोजी भरपगारी सुट्टी जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा सरकारने रविवार २३ जून २०२४ रोजी कुंडई ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ७, वळवई प्रभाग क्रमांक २, केरी  ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ३, फोंडा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ११, राशोल  ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक ५: सेरावली ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक २, सासष्टी तालुक्यातील असोल्णा ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक १ आणि केपे तालुक्यातील शेल्डे ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये आणि डिचोली तालुक्यातील कुडणे व बार्देश तालुक्यातील सुकूर ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक १० मध्ये  पोटनिवडणूक होणार असल्याने ‘मतदानाच्या दिवशी’ भरपगारी सुटी जाहीर केली आहे.

गोवा राज्यातील औध्योगिक कामगार, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, सर्व खाजगी अस्थापने तसेच उध्योग, व्यापार क्षेत्रातील रोजंदारीवरील व सामान्य कर्मचाऱ्यांना ही सुट्टी लागू असेल.