गोवा खबर:नवी दिल्लीतील भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू करीत आहे. निवड वर्ष २०२४-२५ साठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले असून पदव्युत्तर स्तरावर उच्च शिक्षण घेण्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरल संशोधन कार्यक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी स्लॉट्सची संख्या २० आहे.
इच्छुक उमेदवार ( https://overseas.tribal.gov.in/ ) द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२४ अशी आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मंत्रालयाच्या https://overseas.tribal.gov.in/ या पोर्टलला भेट द्यावी.