गोवा खबर: पर्येच्या आमदार तथा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे यांनी त्यांचा वाढदिवस सत्तरी आणि उसगाव येथील समर्थक आणि हितचिंतकांच्या उपस्थिती मध्ये जल्लोषात साजरा केला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत,भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे यांच्यासह राज्यभरा मधील राजकीय नेते, हितचिंतक आणि समर्थकांनी डॉ. देविया राणे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.
यावेळी 10,000 हून अधिक लोक देविया राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. डॉ. देविया राणे यांनी पर्ये मतदारसंघाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी दिलेल्या अतूट समर्पणामुळे समाजाकडून प्रचंड आदर आणि प्रशंसा मिळाली आहे. आपला वाढदिवस हा केवळ एक वैयक्तिक मैलाचा दगड नव्हता तर ज्या लोकांची सेवा करत आहे त्यांच्याशी असलेल्या दृढ बंधनाचा पुरावाही होता,अशा शब्दात देविया राणे यांनी सगळ्यांचे आभार मानले.
मनःपूर्वक शुभेच्छा आणि कृतज्ञता व्यक्त करताना, डॉ. देविया राणे यांनी त्यांना दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आणि आपुलकीबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. सचोटी, करुणा आणि सर्वसमावेशक विकास या तत्त्वांवर पर्ये आणि तेथील जनतेच्या भल्यासाठी अथकपणे काम करत राहण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
हा वाढदिवस सोहळा एकता आणि सामूहिक आकांक्षेचे खरे प्रतिबिंब होता कारण समाज त्यांच्या लाडक्या नेत्या, डॉ. देविया राणे यांच्या उल्लेखनीय प्रवासाचा सन्मान करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी एकत्र आला होता.