Connect with us

गोवा खबर

‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

Published

on

Spread the love

गोवा खबर:वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने देशभरातील सांस्कृतिकसामाजिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रात समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान करण्यात आलाया सोहळ्यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्रीभगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सनातन संस्थेला ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ (पिलर्स ऑफ हिंदुत्वया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेया वेळी सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रचारक श्रीअभय वर्तक यांनी हा पुरस्कार स्वीकारलादेहरादून (उत्तराखंडयेथील सांस्कृतिक विभागाच्या ऑडिटेरीयममध्ये हा सन्मान सोहळा पार पडलाया वेळी ‘देवभूमी रत्न पुरस्कार’ आणि ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘वेदशास्त्र  रिसर्च  ॲण्ड फाऊंडेशन’च्या अध्यक्षा डॉवैदेही ताम्हण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

        या वेळी श्रीअभय वर्तक यांनी पुरस्कार स्वीकारतांना ‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’ आणि अध्यक्षा डॉवैदेही ताम्हण यांचे सनातन संस्थेच्या वतीने आभार मानलेते पुढे म्हणाले कीसनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहेजी संतांच्या मार्गदर्शनानुसार अध्यात्मावर सखोल संशोधन करतेसच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केलीत्यांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर 364 हून अधिक ग्रंथ 13 भाषांत प्रकाशित केले आहेतआपण सनातनच्या आश्रमाला भेट देऊन अध्यात्मावरील संशोधनाचा अवश्य लाभ घ्यावाअसे मी सर्वांना आवाहन करतो.
डॉभगतसिंह कोश्यारी यांनी ‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’ आणि त्यांच्या अध्यक्षा डॉवैदेही ताम्हण यांच्याविषयी म्हणाले कीभारतभरातील विविध राज्यांतील सामाजिकसांस्कृतिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रातील मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित केलेयासाठी व्यापक संशोधनाची आवश्यकता असतेहे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहेत्यांच्याप्रमाणे वेदांचे शिक्षण देणार्‍या अनेक संस्थांची आज आवश्यकता आहे.

       या सोहळ्याला श्रीभगतसिंह कोश्यारी यांच्यासह श्री सतपाल महाराजश्रीतीरथ सिंह रावतश्री हरी चैतन्य पुरी महाराज आणि डॉउमाकानंद सरस्वती महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभलीया वेळी श्री सतपाल महाराजश्रीचंडी प्रसाद भटस्वामी दिनेशानंद भारतीमधु भटकुसुम खंडवालउर्मि नेगीआय..एस्डॉआशिष चौहानकर्नल डी.एस्बर्तवालडॉयशवीर सिंग आणि लेफ्टनंट जनरल जयवीर सिंग नेगी या मान्यवरांना ‘देवभूमी रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आलातसेच सनातन संस्थेसह स्वामी श्री हरि चैतन्य महाराजभाजपचे खासदार श्रीगोपाल शेट्टीश्रीगोलंदे महाराजश्रीउद्बोध महाराज पैठणकरश्रीअतुल जेसवानीश्रीप्रदोष चव्हाणकेगीता प्रेस आणि कुर्माग्राम आश्रम यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ (पिलर्स ऑफ हिंदुत्वया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.