Connect with us

गोवा खबर

माहिती खात्यातर्फे नाट्यप्रवेश आणि आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे ग्रामपंचायत बांदोडा आणि जिल्हा पंचायत सदस्य कवळे यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी फर्मागुडी फोंडा येथे आयोजित राज्यस्तरीय मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे  जीवन आणि कार्यावर हायस्कुल आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा नाट्य प्रवेश स्पर्धा आणि आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सकाळी ९.०० वाजल्यापासून फर्मागुडी येथील श्री गणपती देवस्थानाच्या प्रांगणात होईल.

नाट्य प्रवेशासाठी अधिकाधिक मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. नाट्य प्रवेश स्पर्धेत विजेत्या पथकांना पहिले १० हजार, दुसरे ७ हजार आणि तिसरे ५ हजार रूपये अशी तीन रोख बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

 आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रत्येक महाविद्यायाच्या दोन विद्यार्थ्य़ांना भाग घेता येईल. पहिल्या स्पर्धकासाठी प्रथमिक फेरी होईल आणि अंतिम फेरीसाठी पाच पथकांची निवड होईल. स्पर्धेच्या विजेत्यांना पहिले रोख ७,५००/- रूपये, दुसरे ५,०००/- रूपये आणि तिसरे ३,०००/-  रूपये आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. तसेच प्रत्येकी ५००/- रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येईल.

Goa Tourism Department
#ADVt गोव्यात आज पासून किंग मोमोची राजवट.. आज पासून कार्निव्हलची सुरुवात.. पर्वरी येथे आज कर्टन रेझर..!

नाट्य प्रवेश स्पर्धा आणि आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्यांनी आपल्या प्रवेशिका १६ फेब्रुवारी २०२४ पूर्वी माहिती आणि प्रसिध्दी खात्याच्या कार्यालयात सुपूर्द कराव्यात .

अधिक माहितीसाठी  श्री. श्याम गांवकर यांच्याकडे मोबाईल क्रमांक ९४२२४४४६२४ वर संपर्क साधावा.