गोवा खबर:आदिवासी कल्याण खात्याच्यावतीने “अनुसूचित जमाती विद्यार्थ्यीं प्री-मेट्रीक (इयत्ता ९ वी आणि १० वी) आणि पोस्ट-मेट्रीक शिष्यवृत्ती” या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी करण्यत येते. हे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ( https://scholarships.gov.in ) वर ऑनलाइन अर्ज मागविता येते.
आदिवासी कल्याण संचालनालयाने २-२३-२४ वर्षाच्या प्री-मेट्रीक आणि पोस्ट-मेट्रीक शिष्यवृत्ती योजनेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर मुदत वाढविली आहे. अर्ज सुपुर्द करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे आणि आयएनओ पातळीवरील पडताळणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२४ आणि जिल्हा पातळीवरील पडताळणीची अंतिम तारीख १५ मार्च २०२४ आहे.

#ADVT विकसित भारत;विकसित गोवा 2047!
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सर्व अर्जदारासाठी आधारकार्ड नंबर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आधाराशिवाय अर्ज करणाऱ्या अल्पवयीन अर्जदारांसाठी पालक किंवा कायदेशीर पालकांनी आधार देणे सक्तीचे असेल.
२०२४-२५ वर्षापासून आधार आधारित बायो-मेट्रिक प्रमाणीकरण आणि ईकेवायसी सक्तीचे असेल. परंतु प्रक्रिया सोपी करण्यासाठी २०२३-२४ वर्षासाठी वन-टाइम पासवर्ड (OTP) आधारित प्रमाणिकरणासही परवानगी देतील. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलावर नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला वापरात असलेला मोबाईल नंबर आपल्या आधारकार्ड नंबरला लिंक केलेला असावा.
शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येईल. संस्था प्रमुख/ नोडल अधिकाऱ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर जाऊन अर्जांची पडताळणी केली पाहिजे.