Connect with us

गोवा खबर

त्रिपुरारी उत्सवानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर:विठ्ठलापूर, साखळी येथे राज्य स्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित भरगच्च कार्यक्रमांना रविवारी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे ‘गोवा सरकारच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पां’वर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनातील भव्य छायाचित्रे पहायला लोकांनी गर्दी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे, मयेचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट यांनी उपस्थित राहून प्रदर्शनाचा आस्वाद घेतला.

यावेळी  पर्यटन खात्याचे संचालक, श्री. सुनील अंचिपका, कला व संस्कृती खात्याचे संचालक, श्री. सगुण वेळीप, साखळीच्या नगराध्यक्षा, रश्मी देसाई, कारापुर सर्वण पंचायतीचे सरपंच, श्री. दत्तप्रसाद खारकांडे, जिल्हा पंचायत सदस्य, श्री महेश सावंत व श्री शंकर चोडणकर, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे, श्री दिपाजी राणे, दीपावली समितीचे अध्यक्ष, श्री. दिनेश उसपकर अन्य मान्यवरांनी प्रदशनाला भेट देऊन पाहणी केली.

वाळवंटीच्या पात्रात झालेल्या नौकाविहार स्पर्धेबरोबरच हे प्रदर्शन लोकांसाठी खास आकर्षण ठरले. गोव्यासह शेजारच्या राज्यांतील जमलेल्या हजारो भाविकांनी प्रदर्शनात गोवा सरकारचे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, छायाचित्रांद्वारे पहिले. या उत्‍सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण असलेल्या, पर्यावरणपूरक नौकानयन स्पर्धे बरोबरच या अनोख्या प्रदर्शनाने देखील लोकांचे लक्ष वेधले. यंदा एकूण 25 नौका स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

पर्यटन, कला आणि संस्कृती, माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि विठ्ठलापूर दीपावली उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा करण्यात आला.

नौकायन स्पर्धेचे श्री श्याम गावकर व समृध्दी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले.