पणजी येथे ८ ते १३ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन
गोवा खबर: आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा- २०२४ साठी आता प्रतिनिधी नोंदणीस प्रारंभ झाला आहे. हा महोत्सव पणजी येथे ८ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात सहभागासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून यासाठी http://www.purplefest.goa.gov.in/ या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने तसेच गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि केंद्रीय समाज कल्याण व सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या सहकार्याने आयोजित पर्पल फेस्ट हा एक वार्षिक उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून वैविध्यता, सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाचा सोहळा साजरा केला जातो. या महोत्सवात विशेषत्वाने दिव्यांगजनांचे हक्क आणि त्यांची उपलब्धी यावर भर दिला जातो. जानेवारी 2023मध्ये प्रथमच आयोजित हा उपक्रमास भरघोस प्रतिसादास यशस्वी ठरला होता. यंदा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केला जात असून यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींचा सहभाग असेल. त्यामुळे दिव्यांगजनांसाठी अशा प्रकारचा पहिलाच आंतरराष्ट्रीय उपक्रम ठरणार आहे.

#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 31 ऑक्टोबर 2023 चे वेळापत्रक..

यानिमित्ताने राज्याचे दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर यांनी देशभरातील मान्यवर प्रतिनिधी, संस्था आणि माध्यम प्रतिनिधींना महोत्सवासाठी नावनोंदणी करून या सर्वसमावेशकतेच्या महोत्सवाचा भाग होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “नावीन्यतेचे आणि सर्जनशीलतेचे रंग नव्याने मिसळू द्या कारण प्रतिभांना प्रेरणा देण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी, त्यांच्या विकासातील समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि पुन्हा एकदा सर्वसमावेशकतेला दृढ करण्यासाठी किंवा वचनबद्धतेसाठी पर्पल फेस्टने आपले द्वार खुले केले आहे. या वर्षी, आपण एक पुढचे पाऊल टाकत असून हा महोत्सव आंतरराष्ट्रीय बनवताना तो सर्वार्थाने भव्यदिव्य होईल अशी अपेक्षा आहे. पर्पल फेस्टमध्ये प्रत्येक शक्यतेस संधीमध्ये परिवर्तीत केले जाते.”

विविध सत्रांच्या माध्यमातून आरोग्य, प्रवेशसुलभता, शिक्षण आणि लिंगसमानता यासारख्या विषयांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे. याशिवाय, या महोत्सवात दिव्यांगजनांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार असून याद्वारे दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणास प्रोत्साहन देताना त्यांच्यातील सर्जनशीलताही प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न होणार आहे. एक जागतिक व्यासपीठ म्हणून हा महोत्सव व्यक्ती, संस्था आणि तज्ञांमध्ये सहकार्य आणि सक्षमीकरण वाढवणार आहे. महोत्सवाच्या आकर्षक वैशिष्ट्यांमध्ये पर्पल थिंक टँक अंतर्गत विविध परिसंवाद व चर्चासत्रे; दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या क्षमता-कौशल्यांचे प्रदर्शन घडवणारा अडॅप्टिव्ह स्पोर्ट्स चॅम्पियनशिप; कल्पनाशक्तीचे क्षितिज विस्तारणारा कला उपक्रम ज्यामध्ये दिव्यांगजनांद्वारे लाइव पेंटिंग केले जाईल, तसेच स्टारगेझिंग, बर्ड ट्रेल्स आणि समुद्रकिनाऱ्यावरील मजेदार मनोरंजन उपक्रम आदींचा समावेश असेल.
उत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी चार श्रेणींमध्ये उपलब्ध आहे:
१. वैयक्तिक प्रतिनिधी:
– गोवा प्रतिनिधी: मोफत नोंदणी.
– दिव्यांग विद्यार्थी: मोफत नोंदणी.
– इतर: रु. १०००, ३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणीसाठी रुपये ७०० असा सवलतीचा दर.
२. संस्थात्मक नोंदणी:
– संस्था स्तरावर १० सदस्यांचा सहभाग: रु. ५०० प्रति प्रतिनिधी
– गोवा प्रतिनिधी: मोफत नोंदणी.
– दिव्यांग विद्यार्थी: मोफत नोंदणी.
– ३० नोव्हेंबरपर्यंत सवलत शुल्क- रुपये ३०० प्रति प्रतिनिधी.
३. प्रदर्शक:
– दालन आरक्षण: महोत्सवाच्या सर्व दिव्यांसाठी रुपये ६०००
– प्रत्येक दालनामध्ये दोन व्यक्तींना स्थान
– दालन आकार: ३x३ मीटर.
– सर्व प्रतिनिधींना स्वतंत्रपणे वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्यक. अतिरिक्त व्यक्तीसाठी रुपये ५०० प्रवेश शुल्क. अधिक माहितीसाठी registration@purplefestgoa.com या संकेतस्थळावर संपर्क साधा.
४. प्रसारमाध्यम:
– प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी: कोणतेही शुल्क नाही, परंतु नोंदणी अनिवार्य.