Connect with us

गोवा खबर

गोवा राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर;सर्वोत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर यांना

Published

on

Spread the love

गोवा खबर:माहिती आणि प्रसिध्दी खात्याने राज्य पत्रकार पुरस्कार समितीने निवडलेले गोवा राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर केले आहेत.

गोवा सरकार माहिती आणि प्रसिध्दी खात्यामार्फत “गोवा राज्य पत्रकार पुरस्कार” या पुरस्कारांची स्थापना करीत आहे. मागील कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखांसाठी दहा श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. वेगवेगळ्या श्रेणीतील प्रत्येकी २५,०००/-रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गोवा राज्य पत्रकार पुरस्कार योजना स्थानिक पत्रकारांना चांगल्या कथा लिहिण्यासाठी, आत्मविश्वास मिळविण्यासाठी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे  त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होते.

राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द या विषयावर सर्वोत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार गोवन वार्ताचे संपादक श्री पांडुरंग गावकर यांना त्यांच्या संपादकीय ” राजकारणातला भ्रष्टाचार थांबणार कसा ?” साठी मिळाला आहे.  टाइम्स ऑफ इंडियाचे श्री मुरारी शेट्ये यांना ‘सत्तरी रेसिडेंट गोस फ्रॉम पोरिंग पेग्स ऑफ ऑफ लिकर टू  पोरिंग ओव्हर बुक्स या लिखाणासाठी  ग्रामीण लिखाणातील पुरस्कार प्राप्त झाला आहे .

नवहिंद टाइम्सच्या  दनुस्का दा गामा यांना “डिलिंग विथ डिमेंशिया” या अहवालासाठी आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता अहवालासाठी पुरस्कार मिळाला आहे . प्रुडंट मीडियाचे श्री विवेक प्रभू यांना ‘अपंग पण स्वावलंबी’ या लिखाणासाठी  महिला आणि बाल, सामाजिक समस्येचा विशेष संदर्भात रिपोर्टिंगचा पुरस्कार मिळाला आहे . टाइम्स ऑफ इंडियाचे श्री मार्कुस मेरगुल्हाव यांना स्पोर्ट रिपोर्टिंगमध्ये ‘नशिबाने आंधळे, उसगाव येथील १७ वर्षीय चॅम्पियन ऍथलीटने आंतरराष्ट्रीय मंचावर स्थान मिळविले ‘ या लिखाणासाठी हा पुरस्कार पटकावला . रिपोर्टिंग ऑन आर्ट अँड कल्चरचा पुरस्कार  गोवन वार्ताचे अजय लाड यांना  त्यांच्या सांगे -पणसायमळ  येथील  कातळ शिल्पे  जगाच्या  नकाशावर  या लिखाणासाठी  मिळाला आहे.

फोटो जर्नलिझममधील पुरस्कार (वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्र) श्री  हेमंत परब , टाइम्स ऑफ इंडिया (गोवा आवृत्ती) यांना त्यांच्या ‘ गवंडाळी खांडोळा रस्त्यावरील स्ट्रीटलाईटच्या खांबावर होर्डिंग्ज लावलेल्या संरचनेवर एक कामगार धोकादायकपणे उभा आहे या चित्रासाठी मिळाला आहे शिक्षणावरील रिपोर्टिंगचा पुरस्कार प्रुडंटचे श्री स्वप्नील तारी यांना  त्यांच्या ‘कोकोनट ड्रोन’ या अहवालासाठी मिळाला आहे , सरकारच्या कामगिरीच्या अहवालासाठीचा पुरस्कार टाइम्स ऑफ इंडियाच्या श्रीमती गौरी मळकर्णेकर यांना त्यांच्या गोवा फूड प्रोसेसिंग युनिट्स होम बेकरना ब्रेडविनर्स बनवतात या अहवालासाठी मिळाला आहे.

ज्येष्ठ पत्रकार श्री प्रमोद खांडेपारकर यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार सेवेतून निवृत्तीनंतर हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

१६ नोव्हेंबर २०२३ रोजी शहरात होणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त हे पुरस्कार प्रदान केले जातील.

         पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी राज्य पुरस्कार समितीत वरिष्ठ पत्रकार श्री सुधीर सबनीस, , श्री मुकेश थळी, लेखक व वृत्त वाचक सह अनुवादक (निवृत्त) आणि श्री मिलिंद माडगुत, प्राध्यापक (निवृत्त) आणि लेखक यांचा समावेश आहे.