गोवा खबर:३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दक्षता संचालनालयाच्यावतीने दक्षता जागृती सप्ताह पाळण्यात येईल. “भ्रश्टाचाराला नाहीम्हणा, राष्ट्राप्रती बांदिल राहा” अशी या वर्षाच्या दक्षता जागृती सप्तहाची संकल्पना आहे. सप्तहाच्या काळात सरकारी खातीं आणि अस्थांपनांनी कर्मचारी भ्रश्टाचारा विरूध्द लढण्याची शपथ घेतील. त्याचप्रमाणे सप्ताहभर भ्रश्टाचाराविरूध्द जागृती कार्यक्रम, चर्चासत्रे आणि स्पर्धांचें आयोजन करण्यात येईल.

तसेच ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय एकता दिवस पाळण्यात येईल. स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय एकता दिवस पाळण्यात येतो. राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने सरकारी खाती आणि अस्थांपनातील कर्मचारी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतील.