Connect with us

गोवा खबर

डॉ. के. सिवन यांच्या प्रमुख उपस्थितीत एनआयटी गोवाचा नववा दीक्षांत सोहळा

Published

on

Spread the love

गोवा खबर:राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोव्याचा नववा दीक्षांत समारंभ शुक्रवारी, 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता कुंकळ्ळी येथील एनआयटी गोव्याच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून भारत सरकारच्या अंतराळ विभागाचे माजी सचिव डॉ. के. सिवन आणि 201-14 च्या बी. टेक. बॅचच्या माजी विद्यार्थिनी ईशा केणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या वर्षी एनआयटीने माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून आणि शैक्षणिक उत्कृष्टता वाढविण्यासाठी त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन आणि योगदान मिळविण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. माजी विद्यार्थिनी असलेल्या ईशा केणी यांना नवव्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे.

एनआयटी गोवा तर्फे यंदा बी. टेक, एम. टेक आणि पीएचडी पदवीसह 220 पात्र विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. एकूण 157 विद्यार्थ्यांना बी. टेक, 52 विद्यार्थ्यांना एम. टेक पदवी दिली जाणार आहे. या दीक्षांत समारंभाचे वेगळेपण म्हणजे पीएच.डी.ची पदवी प्राप्त करणार् या 11 संशोधक विद्यार्थ्यांची कामगिरी, जी नव्याने स्थापन झालेल्या एनआयटींमध्ये एक उल्लेखनीय यश आहे.

स्थानिक अडचणींचा सामना करूनही एनआयटी गोवाने 2023 च्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मूल्यांकनात अभियांत्रिकी श्रेणीत 09 वे स्थान मिळविले आहे.

Continue Reading