Connect with us

गोवा खबर

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासाठी समाज कल्याण खात्याने अर्ज मागविले

Published

on

Spread the love

गोवा खबर:समाज कल्याण संचालनालयावतीने १ ऑक्टोबर २०२३  रोजी जागतिक ज्येष्ट नागरिक दिनी राज्य पातळीवरील कार्यक्रमात राज्यांतील १४ प्रसिध्द ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. लहान तालुक्यातून एक आणि मोठ्या तालुक्यातून दोन ज्येष्ट नागरिकांची सत्कारासाठी निवड करण्यात येईल.

इच्छुक ७० वर्षे वयोगटातील प्रसिध्द ज्येष्ठ नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज आपली सविस्तर माहिती आणि आवश्यक दाखले ( सॉफ्ट आणि हार्ड कॉपी/सीडी) आणि एका पासपोर्ट आकाराच्या फोटोसह ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत संचालक, समाज कल्याण संचालनालय, १८ जून मार्ग, पणजी येथे सुपुर्द करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कल्याण अधिकारी (उत्तर) समाज कल्याण संचालनालय, पणजी किंवा जिल्हा कल्याण अधिकारी (दक्षिण), समाज कल्याण संचालनालय, माथानी साल्ढाणा प्रशासकीय प्रकल्प, मडगाव,   फोन. क्र. ०८३२-२२३२२५७, २२३१२२५, २२२३७८४ आणि २७९४०२० वर संपर्क करावा किंवा  socialwelfaregoa@rediffmail.com या ई-मेलवर भेट द्यावी.