Connect with us

गोवा खबर

“‘विठ्ठला ओंठार तुझे नांव’ चे ६ सप्टेंबर रोजी लोकार्पण

Published

on

Spread the love
गोवा खबर:सुप्रसिद्ध कोकणी गीतकार श्री जॉन आगियार यांनी लिहिलेले “विठाला ओंठार तुझे नांव” हे नवीन कोंकणी भक्ती व्हिडिओ गाण्याचे लोकार्पण माजी आमदार श्री प्रवीण झांट्ये आणि श्रीमती रेणुका देसाई यांच्या  उपस्थितीत सम्राट अशोक सभागृहात एका साध्या कार्यक्रमात होणार आहे. श्री झांट्ये यांनी व्हिडिओ गाणे प्रायोजित केले आहे, तर श्रीमती देसाई सहप्रायोजक आहेत. उद्योगपती दामोदर कोचकर आणि Dy SP सागर एकोसकर यांनी व्हिडिओ गाण्याच्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
 हे गाणे सुप्रसिद्ध गायक अक्षय नाईक यांनी गायले आहे. संगीत रचना/व्यवस्था/मिश्रण श्री नाईक यानी स्वतः केले आहे आणि ते श्री महालसा रेकॉर्डिंग स्टुडिओ, सावोई वेरे येथे रेकॉर्ड केले आहे. डीओपी/एडिटिंग/कॅमेरा आणि ड्रोन पायलटिंग आय क्लिकचे श्री उद्धव केरकर करतात.
६.१८ मिनिटांचा हा व्हिडिओ संपूर्णपणे श्री विठोबा देवस्थान, वराड पाटणे, गांवणे, फोंडा गोवा येथे चित्रित करण्यात आला आहे .म्युझिक व्हिडिओ श्री जॉन आगियार आणि श्री अक्षय नाईक यांच्या You Tube चॅनलवर अपलोड केला जाईल