Connect with us

गोवा खबर

यंदा माशेलचा चिखलकाला ठरणार पर्यटन उत्सव 

Published

on

Spread the love
गोवा खबर:शिगमो आणि कार्निव्हल व्यतिरिक्त गोव्यात अनेक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जात असले तरी आता पर्यंत त्याकडे पर्यटनाच्या नजरेने पाहिले जात नव्हते.पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी ही उणीव दूर करण्याच्या दृष्टिने पावले उचलत सांजाव आणि चिखलकाला या गोव्यातील पारंपरिक उत्सवांची पर्यटकांना ओळख करून देण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमांना पर्यटक प्रचंड प्रतिसाद देतात हे सांजावने सिद्ध केल्या नंतर आता माशेल मधील चिखलकाल्याची जय्यत तयारी सुरु झाली असून यावेळी दिग्गज कलाकार हजेरी लावून आपली कला सादर करणार असल्याने यंदा माशेलचा चिखलकाला स्थानिकां बरोबर पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे..
माशेल येथील श्री देवकी कृष्ण मंदिरामध्ये 28 ते 30 जून दरम्यान चिखलकाल्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
28 जून रोजी सायंकाळी सात वाजता दीपप्रज्वलन करून चिखलकाला उत्सवाचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.त्यानंतर 7.15 ते 8.30 दरम्यान देवानंद मालवणकर आणि प्रियांका रायकर यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाची मैफल रात्री 8.30 पासून रंगणार आहे.
29 जून रोजी रात्री 8 वाजल्या पासून भक्ती संगीताचा भक्तीरंग कार्यक्रम होणार असून त्यामुळे वातावरण भक्तीमय होणार आहे.
30 जून रोजी सकाळी 11 वाजल्या पासून पारंपरिक चिखलकाल्याला सुरुवात होऊन दुपारी अडीच वाजता मंदिरा मधील आरतीने उत्सवाची सांगता होणार आहे.
यंदाच्या चिखलकाल उत्सवात पारंपरिक चिखलकाल्या बरोबरच गोमंतकीय खाद्य संस्कृतीचे दर्शन घडणार असून प्रख्यात गायकांच्या भक्ती संगीताने माहौल भक्तिमय बनवला जाणार असल्याने स्थानिकां बरोबर पर्यटक देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावतील अशी आशा पर्यटन खात्याने व्यक्त केली आहे..

Continue Reading