Connect with us

गोवा खबर

अंतिम श्वासापर्यंत काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी लढू, याचिका मागे घेतल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका ! : अधिवक्ता विष्णु शंकर जैन

Published

on

Spread the love
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा द्वितीय दिवस !

गोवा खबर: उत्तरप्रदेश येथील काशी येथील ज्ञानवापी मशिदीत 16 मे 2022 मध्ये शिवलिंग मिळाल्यापासून आम्ही सातत्याने त्याच्या मुक्तीसाठी लढा देत आहोतया लढ्यात मुसलमान पक्षकार यशस्वी होणार नाहीत हे ज्ञात असल्यानेते या याचिकेच्या संदर्भात अडथळे निर्माण करण्याचे कार्य करत आहेततसेच काही जणांना हाताशी धरून याचिका मागे घेतल्याच्या अफवा पसरवत आहेतप्रत्यक्षात कोणतीही याचिका आम्ही मागे घेतलेली नाहीआणि मी सर्वांना खात्री देतो कीजीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी आम्ही लढत राहूकाशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या श्री श्रृंगारगौरी देवीहनुमानश्रीगणेश येथील देवतांची पूजा करण्याचा अधिकार मिळावायासाठी आम्ही लढा देत आहोतकाशी विश्वेश्वराची मुक्ती होईलतेव्हा देश अखंड हिंदु राष्ट्र होईलकाशी विश्वेश्वराच्या मुक्तीचे मोठे लक्ष्य घेऊन आपण मार्गक्रमण करत आहोतयासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी लावून धरायला हवीअसे आवाहन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.

 ते ‘श्रीरामनाथ देवस्थान’फोंडागोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात बोलत होते.
       या प्रसंगी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संदर्भातील सद्यस्थितीतसेच कर्नाटक येथील सहकार संजीवनी रुग्णालयाचे डॉएन्रमेश हासन यांनी चन्नकेवर मंदिरात कुराण वाचण्याच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती दिलीतर आंध्रप्रदेश येथील हिंदू उपाध्याय समितीचे संस्थापक अध्यक्ष महेश डेगला यांनीही मनोगत व्यक्त केले.

गंगानदीमध्ये रोगमुक्त करण्याची क्षमता असल्याने गंगाजलावर  अधिक संशोधन होणे आवश्यक – अधिवक्ता अरुण गुप्ताअलाहाबाद उच्च न्यायालय

       गंगा नदीमध्ये प्राणवायूची पातळी सर्वाधिक असून नदीत ‘बॅक्टेरिया फॉस’ नावाचा विषाणू असतोत्यामुळे गंगाजल खराब होत नाहीकोरोनाकाळात गंगा नदीच्या किनार्‍यावरील शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अन्य शहरांहून अल्प आढळले असून बरे होणार्‍यांची संख्याही अधिक आढळून आली आहेकेवळ कोरोनाच नाहीतर अन्य आजारही गंगेच्या पाण्याने बरे होऊ शकतातत्यामुळे अशा गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
    या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारेतसेच ‘HinduJagruti’ या ‘युट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.