गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र मुख्यालय येथे होणाऱ्या योग सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:

“संयुक्त राष्ट्र मुख्यालय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. तुमच्या सहभागाने हा कार्यक्रम आणखी खास बनेल.
उत्तम आरोग्य आणि निरोगीपणासाठी योग जगाला एकत्र आणत आहे. जागतिक स्तरावर योग अधिकाधिक लोकप्रिय होत राहो.”