Connect with us

देश खबर

जमीन रुपांतरणातून मंत्री राणे गोवा विकण्याच्या मार्गावर: चोडणकर

Published

on

Spread the love
– लोकांनी कलम 17 (2) ला विरोध करावा 
गोवा खबर: नगरनियोजन कायद्याच्या कलम 17 (2) वर तीव्र आक्षेप घेत काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी टीसीपी आणि वनमंत्री विश्वजित राणे आपल्या दोन्ही खात्यांचा वापर गोव्यातील जमीन विकण्यासाठी आणि राज्यातील जमनी नष्ट करण्यासाठी करत असल्याचा आरोप केला आहे.
चोडणकर यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने त्यांना हवे तसे क्षेत्र बदलण्यासाठी 17(2) कलम आणले आहे.
 “आता जर कोणी येऊन सांगितले की त्यांची जमीन सॅटलमॅन्ट श्रेत्राऐवजी ऑचर्ड मध्ये दाखवली आहे, तर सरकारला टीसीपी कायद्याच्या कलम 17 (2) च्या मदतीने ती दुरुस्त करण्याचा अधिकार आहे,” असे चोडणकर म्हणाले.
ही प्रक्रिया गोव्याच्या हितासाठी केली नसून विश्वजीत राणे यांनी आपल्या कल्याणासाठी केली आहे, असे ते म्हणाले.
 “जर यामागे कोणताही छुपा अजेंडा नसेल तर सरकारने या प्रस्तावित दुरुस्त्या लवकरात लवकर रद्द कराव्यात, नाहीतर हे सरकार कोणासाठी काम करत आहे ते सिद्ध होईल,‘’ असे चोडणकर म्हणाले,
चोडणाकर म्हणाले की, 250 चौरस मीटरच्या जमिनीचा लहान भागही या दुरुस्तीचा वापर करून सेटलमेंटमध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो.
“प्रादेशिक आराखडा 2021 बेकायदेशीरपणे केलेला आहे, हे विश्वजित राणे यांना अचानक दिसून आले हे आश्चर्यकारक आहे. आता दुरुस्तीच्या नावाखाली झोनमध्ये बदल करून भ्रष्टाचार करण्यात येईल व आणखी एक घोटाळा होईल,’ असा आरोप चोडणकर यांनी केला.
गोव्याच्या टीसीपी कायद्याच्या कलम 17(2) अंतर्गत गोव्याची जमीन मनमानी पद्धतीने रुपांतरीत करणाऱ्या कृतीचा त्यांनी निषेध केला.
“रुपांतरणाच्या या प्रक्रियेत पारदर्शकता नाही. सरकारने स्थानिक प्रशासकीय संस्थांना, त्यांच्या अधिकारक्षेत्रावर लक्षणीय परिणाम होत असतानाही, रूपांतरण प्रक्रियेतून वगळले आहे, ” असे  त्यांनी म्हटले.
ते म्हणाले की, खाजगी जंगले म्हणून ठरवलेल्या क्षेत्रांच्याही रूपांतरणाच्या घटनांमुळे राणे यांच्या हितसंबंध दिसून येत आहेत.
” मंत्र्यांच्या जवळच्या लोकांना फायदा करून देण्यासाठी घाऊक पद्धतीने जमनी रूपांतरित करणे आणि यातून मोठा पैसा मिळवणे हा या प्रकियेचा हेतू आहे,” असे ते म्हणाले.
” राज्यातील जनतेने या दुरुस्तीला आक्षेप घेण्याची वेळ आली आहे, अन्यथा हे सरकार आपला सुंदर गोवा नश्ट करून टाकणार.” असे चोडणकर म्हणाले.