गोवा खबर:संपर्क से समर्थन या भाजपाच्या राष्ट्रव्यापी मोहीमेखाली पर्यटन तथा माहीती तंत्रज्ञान मंत्री रोहन अशोक खंवटे यांनी सांताक्रूझ मतदारसंघातील त्यानंतर संवाद साधला. भाजपा कार्यकर्त्यासहीत त्यांनी सर्वसामान्य लोकांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी कार्याची माहिती त्यांच्या समोर ठेवली.
त्यांच्यासोबत भाजपचे उपाध्यक्ष केशव प्रभू व सांताक्रूझ भाजप मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या कालावधीतील सरकारच्या कार्याची माहीती जनतेला करून देण्यासाठी संपर्क से समर्थन मोहीम राष्ट्रीय पातळीवर सुरु करण्यात आली आहे.
या मोहीमे अंतर्गत केंद्रातील मोदी सरकारच्या विविध स्तरांवरील उपलब्धी जनतेपर्यंत पोचविण्यात येत आहेत. केंद्रात मोदी सरकार ज्या गतीने काम करीत आहे त्यानुसार भारत जगात अव्वल ठरण्याच्या दिशेन मार्गक्रमण करीत असल्याचे पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले.
शेतकरी असो वा मजूर, महिला असो वा बालकल्याण, कृषी असो वा आरोग्य, पर्यटन असो वा पर्यावरण, उद्योग वा आयटी अशा विविध आघाड्यांवर केंद्र सरकारचे जे कार्य सुरू आहे त्याव्दारे भारत देश प्रगतीपथावर पोचल्याची माहिती खंवटे यांनी सोदाहरण जनलेला यावेळी करून दिली.
मोदी सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण संकल्पनेखाली जनतेला विनासायास अनेक योजना उपलब्ध करून दिल्या त्याचाही उल्लेख खंवटे यांनी नागरिकांशी संवाद साधताना केला. केंद्रात मोदी सरकारची कशासाठी गरज आहे याचीही माहिती त्यांनी नागरिकांशी साधलेल्या संवादा दरम्यान दिली.