गोवा खबर:गोवा राज्य जैवविविधता मंडळ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी वेर्णा उध्योग संघटना आणि मडगांव स्थित सास्ट रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून रोजी जागरूकता सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.

नौदल अधिकारी संस्था वास्को येथून सकाळी ६.३० वाजता, पणजी दिवजा सर्कल येथून सकाळी ६.१५ वाजता, फोंडा नगरपालिका येथून ६.०० वाजता आणि मडगाव रवींद्र भवन येथून सकाळी ६.०० वाजता सायकल रॅलीला सुरूवात होईल. सर्व सायकलस्वार कुठ्ठाळी फेरी येथे जमा होतील आणि तेथून सकाळी ७.१५ वाजता पुढच्या रॅलीस सुरवात होईल.