गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सचिवालयात कॅबिनेट मंत्री आणि आमदार, सरकारचे सचिव, खात्यांचे प्रमुख आणि इतरांच्या उपस्थितीत मिनीस्टेरीयल ब्लॉकचे’ नूतनीकरण करण्यात आलेल्या मंत्रालयाचे उद्घाटन केले.
नूतनीकरण केलेल्या ‘मंत्रालयामध्ये अत्याधुनिक परिषद सभागृह ज्यात टच पॅनलसह वायरलेस प्रेझेंटेशन, व्हिडीओ वॉल यांसारख्या अत्याधुनिक ऑडिओ व्हिज्युअल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व इतर सुविधा आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या जनतेला घटक राज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. हे अत्याधुनिक मंत्रालय आजपासून आपले अधिकृत काम सुरू करणार आहे. हा ३६ वा गोवा घटक राज्य दिन असून आमचे सरकार राज्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करीत आहे असे ते पुढे म्हणाले.