Connect with us

गोवा खबर

साबांखाचे अपयश: आपच्या सेसिल रॉड्रिग्स यांनी रंगवला गतिरोधक

Published

on

Spread the love
गोवा खबर:मीरामार धेंपे कॉलेज येथील गतिरोधक रंगविण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी अपयशी ठरल्यानंतर आम आदमी पार्टीच्या उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स यांनी रविवारी रात्री हा गतिरोधक रंगवला. 
अलिकडेच  पार पडलेल्या जी20 शिखर परिषदेने पणजी शहराला नवीन झळाळी दिली असून दुरुस्तीच्या कामाला विशेषत: रस्ते सुधारकामाला गती दिल्याचे वक्तव्य राज्य जी20 अधिकाऱ्यांनी केले होते. हे सर्व काम करताना रस्ता सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात साबांखा अपयशी ठरल्याचा टोला रॉड्रिग्स यांनी लगावला.
मिरामार धेंपे कॉलेज येथील गतिरोधक वाहनचालकांना धोकादायक ठरले होते. रविवारी रात्री रॉड्रिग्स आणि त्यांची ‘रोस्तो गोवा’ टीम यांनी मिळून येथील गतिरोधक रंगवले. या गतिरोधकापासून पणजीच्या आमदारांचे कार्यालय अक्षरशः ३० मीटर अंतरावर आहे, असे असताना हा गतिरोधक दुर्लक्षित राहिल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले.
‘रोस्तो गोवा’ उपक्रमाचे गडकरींनी केले होते कौतुक
अपघात कमी करण्याच्या उद्देशाने ‘रोस्तो गोवा’ उपक्रम प्रथम ताळगाव मतदारसंघासाठी विकसित करण्यात आला होता. हळूहळू या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतल्याने नंतर राज्यातील इतर भागांमध्ये विस्तार करण्यात आला. या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केले होते.