Connect with us

गोवा खबर

गोवा अभियांत्रिकी महाविध्यालयात ग्रंथालय आणि माहिती विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने जून २०२३ पासून ग्रंथालय आणि विज्ञान विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ग्रंथालय आणि माहिती विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा एक व्यापक कार्यक्रम आहे ज्यामध्ये ग्रंथालय व्यवस्थापनकॅटलॉगिंगवर्गीकरणमाहिती पुनर्प्राप्तीडिजिटल लायब्ररी आणि माहिती विज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंडचे विविध पैलू समाविष्ट आहेत.

      या ग्रंथालय आणि माहिती विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी उमेदवार बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा.  पात्रता निकषप्रवेश प्रक्रियाशुल्क अभ्यासक्रम यासह अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार लायब्ररीला भेट देऊ शकतातया प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२३ अशी आहेअधिक  माहितीसाठी डॉअक्षय निगळ्ये कोर्स समन्वयकlibrarian@gec.ac.in/8080204750/9763465511/0832-2336392 .वर संपर्क साधावा.