Connect with us

गोवा खबर

सांखळी नगरपालिका निवडणूक मतदान आणि मतमोजणी केंद्रा भोवतालची हॉटेल्स बंद ठेवण्याचा आदेश

Published

on

Spread the love

  गोवा खबर:उत्तर गोव्यातील सांखळी नगरपालिका निवडणूकीमुळे ५ मे २०२३ रोजी मतदान होणार आणि ७ मे २०२३ रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रा जवळ लोकांची गर्दी आणि कायदा आणि सुव्यस्थेची समस्या होऊ नये म्हणून उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी सकाळी ६.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६.०० ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत अनुक्रमाने मतदान आणि मतमोजणी  केंद्रा भोवतालच्या १०० मिटर परिसरातील सर्व हॉटेल, रेस्टोरंट, आस्थांपने, बार, चहाची दुकांने, पान शॉप, खानावळ आणि अन्न जीन्नस विक्रि करणारे धाबें, गाडे आणि इतर दुकांने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रा पासून १०० मिटर भागात जमांव बंदीचा आदेश लागू केला आहे. मतदान केंद्रा पासून १०० मिटर भागात ५  किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमांव करण्यास बंदी असेल.

हा आदेश निवडणूक अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लागू नसेल.

तसेच कामावरील लोकसेवक आणि मान्यता असलेले लग्न सोहळे किंवा अंतयात्रा किंवा धार्मिक सोहळे किंवा अशा कोणत्याही कार्यक्रमास हा निर्बंध लागू नसेल. परंतु त्यासाठी जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्याकडून पुर्व परवानगी घेतली पाहिजे.

निवडणूक काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

  सांखळी आणि फोंडा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी ४, ५ आणि ७ मे २०२३ रोजी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.