गोवा खबर:५ मे २०२३ रोजी होणार्या सांखळी नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर झालेल्या आणि निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या नगरपालिका वार्डांतील सर्व दारूची दुकाने, पब्स, क्लब्स, शॅक्स किंवा काणतीही दारू विक्रीची आस्थांपने आचारसंहिता लागू असलेल्या काळांत प्रत्येक दिवशी रात्री १० नंतर बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाविरूध्द अबकारी खात्याच्या भरारी पथकाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.