Connect with us

गोवा खबर

एकता बळकट करण्यासाठी टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका: राज्यपाल

Published

on

Spread the love

गोवा खबर: राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी आज शहरात पोस्ट खाते गोवा पोस्टल रीजन, पणजी यांच्या वतीने आयोजित गोवा प्रादेशिक स्टार पुरस्कार विजेत्याच्या सत्कार समारंभाला उपस्थिती लावली .प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्यपालांनी भारत आणि गोवा स्वातंत्र्यपूर्व काळात खूप चांगली संवाद व्यवस्था होती असे सांगितले आणि लोक एकमेकांशी जोडलेले होते. भारतातील लोकांची एकता मजबूत करण्यासाठी टपाल खात्याच्या सेवांनी मोठी भूमिका बजावली आह असेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल पुढे म्हणाले की, आजकाल लोक दळणवळणासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करीत असले तरी टपाल सेवेचे महत्त्व अजूनही तेवढेच आहे. टपाल  खात्याच्या सर्वात महत्वाच्या कामगिरीचे म्हणजेच बँक सेवा ग्रामीण स्तरावरील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याबद्दल राज्यपालांनी कौतुक केले . राज्यपालांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि टपाल खात्याच्या कर्मचार्‍यांनी खात्याच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.

मेळाव्याला संबोधित करताना मुरगाव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष डॉ एन विनोदकुमार यांनी  गोवा टपाल विभाग हा देशातील सर्वात लहान प्रदेश असला तरी कामगिरीच्या दृष्टीने तो सर्वात शक्तिशाली आहे असे सांगितले. सर्वांचे अभिनंदन करून डॉ एन विनोद कुमार यांनी  पुरस्कार नेत्यांना किंवा वैयक्तिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात आले आहेत पण प्रत्येक कामगिरीच्या मागे एक मोठा संघ असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले. सांघिक कामगिरीमुळे अगम्य लक्ष्य गाठणे शक्य होते असा निष्कर्ष त्यांनी काढला.

पोस्टमास्टर जनरल गोवा क्षेत्र श्री सईद रशीद यांनी माहिती दिली की गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये गोवा प्रदेशाने एकूण ७ लाख ६३ हजार खाती उघडली आहेत. राष्ट्रीय मोहिमेदरम्यान , पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक (POSB) महामेळा, गोवा पोस्टल क्षेत्र एकूण १ लाख ५२ हजार पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक   खाती उघडण्यात ३ ऱ्या क्रमांकावर आहे . त्यांनी खात्यांतील प्रत्येक कर्मचार्‍यांचे अथक परिश्रम केल्याबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की कोणत्याही संस्थेचे यश मुख्यत्वे कार्यबलाची गुणवत्ता आणि समर्पण यावर अवलंबून असते .

श्री रमेश पाटील, श्री मयुरेश कोळे, श्री अर्जुन इंगळे, श्री सौरभ खिस्ते, श्री सचिन पंधावळे, श्री विश्वनाथ गिरकर, श्री दत्ता मस्कर, श्री प्रशांत शेटकर, श्री मनोज पनवार, श्री बलिंदर कुमार यांना गोवा विभागीय स्टार पुरस्कार विजेते म्हणून गौरविण्यात आले. श्री मयुरेश कोळे यांनी स्वागत केले तर श्री युवी विजयकुमार यांनी आभार मानले. श्रीमती रुपाली म्हांबरे यांनी सूत्रसंचालन केले.