Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल रोजी रोजगार मेळावा अंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना नियुक्तीपत्रांचे वितरण करणार

Published

on

Spread the love

 

 गोवा खबर:रोजगार मेळ्या अंतर्गत, सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी  13 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता दृकश्राव्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नवनियुक्तांना संबोधितही करणार आहेत.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने रोजगार मेळा हे एक पाऊल आहे. रोजगार मेळा, रोजगार निर्मितीमधील प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल तसेच युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रविकासात त्यांच्या थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल.

देशभरातून निवडण्यात आलेले नवनियुक्त, भारत सरकारच्या अंतर्गत ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, वरिष्ठ कमर्शियल तथा  तिकीट लिपिक, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक,  आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, वरिष्ठ ड्रॉफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, परिचारिका, परिविक्षाधीन अधिकारी, स्वीय सहाय्यक-पीए, बहू-उद्देशीय स्टाफ – एमटीएस, अशा विविध स्थानांवर /पदांवर रुजू होतील.

नवनियुक्त उमेदवारांना, कर्मयोगी प्रारंभ मोड्युल मधून प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होईल. कर्मयोगी प्रारंभ मोड्यूल म्हणजे विविध सरकारी विभागांतील नवनियुक्तांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण अभ्य़ासक्रम आहे.

Continue Reading