Connect with us

गोवा खबर

राज्यपालांहस्ते गरजूना आर्थिक साहाय्याचे वितरण

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांखळी येथील रविंद्र भवनात राज भवनाच्या फंडातून सुमारे ४८ डायलीसीस आणि कॅन्सर रूगणांना आर्थिक साहाय्याचे वितरण केले तसेच गरजूना राज्य दिव्यांग आयुक्ताने आयोजित केलेल्या नवीन मेंदू नियंत्रित मायोइलेक्ट्रिक हात वितरित केले.

याप्रसंगी बोलताना राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी एक पृथ्वी एक कुटुंब आणि भविष्य जागतिक कल्याणाचा मार्ग प्रशस्त करील असे सांगितले आणि हे वसुधैव कुटुंबकम् या भारतीय संकल्पनेतून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थितांसमोर बोलताना राज्यपालांनी निवडून आलेले प्रतिनिधी लोकांच्या कल्याणासाठी बांधील असल्याचे सांगितले. त्यांनी सामान्य लोकांच्या भल्यासाठी सतत कार्य करण्याचे त्यांना आवाहन केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा करीत राज्यपालांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे दूरदृष्टीचे नेते असून गोव्याला स्वयंपूर्ण करण्याचा त्यांचा उद्देश लवकरच पूर्ण होईल असे ते म्हणाले.

राजभवन सामान्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित असल्याचे राज्यपालांनी सांगितले आणि राज भवनने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी राज्यात लवकरच कायम दिव्यांग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन देऊन प्राधान्य तत्वावर राज्यात मोटर न्यूरॉन केंद्र स्थापण्यात येणाँर असल्याचे सांगितले आणि हा दीर्घ काळाचा विषय असल्याचे ते म्हणाले. डायबिटीस परिस्थितीचे प्रतिपादन करून मुख्यमंत्र्यांनी साखर कमी खाण्याचा सल्ला लोकांना दिला. त्यांनी राज्यपालांच्या कार्याची प्रशंसा केली.

याप्रसंगी बोलताना समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी राज भवनच्या कार्याची प्रशंसा केली तसेच राज्यातील सर्व गावांना भेटी देण्याच्या राज्यपालांच्या कार्याची प्रशंसा केली.

सुरवातीस राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई, राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, दिव्यांग आयोगाचे अध्यक्ष श्री गुरूप्रसाद पावसकर आणि जिल्हा पंचायत सदस्य श्री गोपाळ सुर्लकर उपस्थित होते.

श्रीमती सिध्दी परब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि श्री गुरूप्रसाद पावसकर यांनी आभार मानले.